राजकारण जर बहुमतावर चालत असेल, तर बहुमताची आवड बदलावी लागेल. प्रशासकीय, राजकीय, सामाजिक व्यवस्था बहुमताला समजावून सांगावी लागेल. सकारात्मक विचारांचं बहुमत तयार करावं लागेल. काम कठीण आहे. पण अशक्य नाही. ज्यांना बदल हवाय, त्यांना बदलाच्या प्रक्रियेतूनच जावंच लागेल. त्यासाठी धीर, चिकाटी, मुळात विचारांची प्रामाणिकता हवी. विद्यमान नियमकायद्यांच्या अंमलबजावणीचा आग्रह, काही कायद्यांत काळानुरूप सुधारणा, आवश्यकतेनुसार नव्या कायद्यांची मागणी आणि समांतर पातळीवर लोकशिक्षण ही आपली कार्यपध्दती आहे